PhonePe Logo
phonepe logo
Business SolutionsPressCareersAbout UsBlogContact UsTrust & Safety
hamburger menu
✕
HomeBusiness SolutionsPressCareersAbout UsBlogContact UsTrust & Safety
Privacy Policy

तक्रार धोरण

Englishગુજરાતીதமிழ்తెలుగుमराठीമലയാളംঅসমীয়াবাংলাहिन्दीಕನ್ನಡଓଡ଼ିଆ

तक्रार धोरण

PhonePe प्राइवेट लिमिटेड (पूर्वी FX मार्ट प्राइवेट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) या कंपनीने PhonePe अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे, या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 1956 अंतर्गत झालेली असून, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय – ऑफिस-2, मजला 4,5,6,7, विंग ए, ब्लॉक ए, सालारपुरिया सॉफ्टझोन, सर्व्हिस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बेंगळुरू, कर्नाटक-केए, पिन- 560103 येथे आहे.

तुम्ही दाखवलेला विश्वास PhonePe साठी मोलाचा आहे आणि तुम्हाला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आम्ही ग्राहकांना प्रामाणिकपणे आणि सुयोग्य सेवा देत असताना ग्राहकांच्या तक्रारी योग्य वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सोडवल्या जाव्यात, यासाठी आम्ही तक्रार धोरण (ग्रिव्हन्स पॉलिसी) तयार केले आहे.

PhonePe अ‍ॅपद्वारे व्यवहार करताना तुम्हाला अमर्यादित अनुभव देता यावेत आणि आवश्यक असल्यास, आमच्या अ‍ॅपमधील ग्राहक तक्रार निवारण साहाय्यता प्रक्रियेद्वारे तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. क्वचित वेळा मानवी चुका, यंत्रणेतील त्रुटी किंवा नेटवर्कमधील दोष यामुळे काही मामले उद्भवतात. याकडे अधिक लक्ष पुरवणे आणि त्या सुयोग्य पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. तुम्ही पुढीलप्रमाणे आमचा तक्रार निवारणाचा अनुक्रम पाहू शकता.

तक्रार सोडवणे

योग्य टीमने तुमच्या तक्रारींची दखल घेतली असून, त्या सोडवल्या जात आहेत याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही एक एक्सलेशन मॅट्रिक्स बनवले आहे. तुमच्या तक्रारी योग्य वेळेत सोडवल्या जात आहेत की नाही यासाठी तुम्ही खाली दिलेले एस्कलेशन मॅट्रिक्स वाचून आणि समजून घ्यावी, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.

ग्राहकांना स्वत:मदतीसाठी देण्यात आलेली आमची मदत पृष्ठ तुम्ही काळजीपूर्वक वाचावीत अशी आम्ही शिफारस करतो. या मदत पेजवरून तुमच्या प्रश्नांची आणि तक्रारींची दखल घेतली गेली नसेल, तर तुम्ही आमच्या ग्राहक सहाय्यक टीमशी फोन, ई-मेल किंवा PhonePe अ‍ॅपद्वारे संपर्क साधू शकता.

आमचे अ‍ॅपमधील सपोर्ट माध्यम बहुतांश ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सक्षम आहे. तरीही काही परिस्थितींमध्ये तुम्हाला तुमची तक्रार पुढील पायरीवर मांडायची असेल, तर तुम्ही त्यापूर्वी सर्व पायऱ्या वापरून पाहिल्या आहेत आणि यानंतरही तुमची समस्या सोडवली गेलेली नाही किंवा त्याने तुमचे समाधान झालेले नाही याची खात्री करावी.

सेवा स्तर

रिचार्ज, बिल पे, Phonepe वॉलेट, Phonepe गिफ्ट कार्ड, UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस), स्टोअर्स, गुंतवणूक (म्युच्युअल फंड/ Phonepe सोने), Phonepe स्विच आणि व्हाउचर यांसाठी सेवा स्तर

स्तर– 1

  1. तक्रार नोंदणी :
    • PhonePe अ‍ॅपच्या होम पेज (?) च्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही PhonePe ग्राहक साहाय्यसह तुमची तक्रार नोंदवू शकता.
    • आम्ही ग्राहक साहाय्यता सेवा दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस पुरवतो.
  2. तक्रारींचे निराकरण:
    • तक्रार प्राप्त झाल्यापासून तुम्हाला 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
    • आम्ही तुमच्या सर्व तक्रारी/प्रश्न 3 कामकाजाच्या दिवसांत सोडवण्याचे ध्येय ठेवतो.
    • ऑपरेशनल किंवा तांत्रिक कारणांमुळे तुमच्या तक्रारीचे निराकरण होण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या तक्रारीची दखल घेणाऱ्या वेळापत्रकाबद्दल सक्रियपणे माहिती दिली जाईल.
    • काही परिस्थीतींमध्ये, तक्रारीचे निराकरण झटपट होत असताना, त्याला सिस्टममध्ये प्रतिबिंबित होण्यास वेळ लागू शकतो. उदाहरणार्थ, रिफंडसाठी परवानगी त्वरित मिळालेली असू शकते, परंतु खात्यात पैसे जमा होण्यासाठी 3 ते 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो. कृपया लक्षात घ्या, की असे विलंब बँकिंग आणि इतर ऑपरेशनल समस्यांसाठी कारणीभूत आहेत.
    • अनेक एजन्सींच्या सहभागामुळे ‘फसवणूक आणि जोखीम मूल्यांकनाशी संबंधित तक्रारींचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागतो. अशा प्रकरणांमध्ये निराकरणासाठीचा वेळ प्रकरणाची तीव्रता आणि जटिलतेवर अवलंबून असते. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला वेळापत्रकाची सक्रियपणे माहिती दिली जाईल.
      सूचना: निराकरण करण्यामध्ये विलंब असल्यास, युजरला सक्रियपणे माहिती दिली गेली पाहिजे. जर युजर समाधानी नसेल, तर स्तर 2 वर तक्रार वाढवली पाहिजे.

स्तर– 2

  1. तक्रार नोंदणी :

तुम्ही तक्रार वाढवण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही चॅनेल अ‍ॅक्सेस करू शकता. https://support.phonepe.com/ वर तक्रार नोंदवा.

080-68727374/022-68727374 वर ग्राहक साहाय्यता केंद्राला कॉल करा.

2. तक्रारींचे निराकरण:

तक्रार प्राप्त झाल्यापासून तुम्हाला 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

स्तर 2 च्या सर्व तक्रारी कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत सोडवण्याचे आमचे ध्येय आहे. रिझोल्यूशन वेळेत कोणताही विलंब तुम्हाला सक्रियपणे कळवला जाईल.

स्तर– 3

तक्रार नोंदणी:

जर तुमची समस्या आधीच्या स्तरांवर पुढील कालावधीत सोडवली गेली नसेल तर तुम्ही तक्रार डेस्कशी संपर्क साधू शकता,

  • गैर-PhonePe QR च्या माध्यमातून केलेल्या पेमेंटशी संबंधित समस्यांसाठी 30 दिवस
  • इतर कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित समस्यांसाठी 10 दिवस

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, तक्रार अधिकाऱ्याचे नाव आणि संपर्क तपशील खाली दिले आहेत:

संपर्क:
प्रमुख नोडल अधिकारी – सिनू सुधाकर  
नोडल अधिकारी – सिनचान कुमार साहा
फोन: 080-68727374/022-68727374
वेबपेज: https://grievance.phonepe.com/
पत्ता- ऑफिस -2, मजला 4,5,6,7, विंग -ए, ब्लॉक – ए, सलारपुरिया सॉफ्टझोन,सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बेंगलुरु, कर्नाटक – KA, पिन – 560103
कामाचे तास: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत.

2. तक्रारींचे निराकरण:

तक्रार प्राप्त झाल्यापासून तुम्हाला 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
स्तर 3 च्या सर्व तक्रारी कामकाजाच्या सात दिवसांच्या आत सोडवण्याचे आमचे ध्येय आहे. रिझोल्यूशन वेळेत कोणताही विलंब तुम्हाला सक्रियपणे कळवला जाईल.

स्तर – 4

तुमची शंका किंवा तक्रार आधीच्या स्तरांवर 30 दिवसांच्या आत समाधानकारकपणे सोडवली गेली नसल्यास, तुम्ही डिजिटल लोकायुक्तांशी संपर्क साधा. 

लोकपालचे तक्रार दाखल करण्याचे पोर्टल: https://cms.rbi.org.in/
टोल-फ्री फोन नंबर: 14448
ई-मेल आयडी: [email protected]
पत्ता – सेंट्रलाइज रिसिप्ट अँड प्रोसेसिंग सेंटर, भारतीय रिझर्व्ह बँक, 4था मजला, सेक्टर 17 चंदीगड – 160017
अधिक तपशीलांसाठी, कृपया – RBI Ombudsman ही लिंक पाहा.

ग्राहकांच्या जबाबदारीची मर्यादा

अनधिकृत पेमेंट व्यवहारामुळे उद्भवणारी ग्राहकाची जबाबदारी अशी मर्यादित असेल:

अनुक्रमतपशीलग्राहकाची कमाल जबाबदारी
1PhonePe कडून अंशदायी फसवणूक/निष्काळजीपणा/ किंवा उणीव (ग्राहकाने व्यवहाराची नोंद केली आहे की नाही याची पर्वा न करता)शून्य
2तृतीय-पक्षाचे उल्लंघन जेथे PhonePe किंवा ग्राहक दोन्हीकडे उणीव नाही परंतु सिस्टममध्ये इतरत्र आहे आणि ग्राहक अनधिकृत पेमेंट व्यवहारासंदर्भात PhonePe ला सूचित करतो. -अशा प्रकरणांमध्ये प्रति व्यवहार ग्राहकाची जबाबदारी PhonePe कडून ग्राहकाद्वारे व्यवहार संप्रेषणाची पावती आणि ग्राहकाने PhonePe ला अनधिकृत व्यवहाराची तक्रार दरम्यान किती दिवस उलटले यावर अवलंबून असेल –
i. तीन दिवसांमध्ये#शून्य
ii. चार ते सात दिवसांमध्ये#व्यवहार मूल्य किंवा ₹10,000/- प्रति व्यवहार, जे कमी असेल ते
iii. सात दिवसांच्या पुढे#PhonePe केसनिहाय आधारित निर्णय घेईल
3त्याने/तिने पेमेंट क्रेडेंशिअल शेअर करण्यासारख्या ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले आहे अशा केसमध्ये, ग्राहक PhonePe ला अनधिकृत व्यवहाराची तक्रार करेपर्यंत संपूर्ण नुकसान सहन करेल. अनधिकृत व्यवहाराची तक्रार दाखल केल्यानंतर होणारे कोणतेही नुकसानाचे वहन PhonePe द्वारे केले जाईल
4PhonePe त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, ग्राहकांच्या निष्काळजीपणासारख्या केसमध्येही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट व्यवहाराच्या बाबतीत ग्राहकांची कोणतीही जबाबदारी माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

मर्यादित दायित्वावर ग्राहकांची जबाबदारी.

  • मजबूत पासवर्ड आणि पिन वापरून ग्राहकांनी त्यांच्या खात्यांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, ते नियमित अंतराने बदलणे आवश्यक आहे. PhonePe च्या कर्मचाऱ्यांसमवेत, ई-मेल/ दूरध्वनीद्वारे पिन/ पासवर्ड आणि OTP कोणाशीही शेअर करू नये. PhonePe असे क्रेडेन्शिअल्स कधीच विचारणार नाहीत.
  • ग्राहकांना त्यांचे मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी नियमितपणे PhonePe सह अपडेट करणे आवश्यक आहे, यामुळे माहिती अपडेटड ठेवली जाईल आणि चालू अलर्ट प्राप्त होतील.
  • इलेक्ट्रॉनिक पेमेंट व्यवहारांसाठी ग्राहकांनी अनिवार्यपणे SMS अलर्ट आणि ई-मेल अलर्ट (जेथे लागू असेल) साठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही अनधिकृत व्यवहाराची ओळख पटवण्यासाठी ग्राहकांनी SMS अलर्टवरून किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नियमितपणे व्यवहाराचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
  • अहवालात उशीर होणार नाही याची खातरजमा करून खात्यावरील कोणत्याही अनधिकृत व्यवहाराची तातडीने PhonePe ला तक्रार करण्याची जबाबदारी ग्राहकाची आहे.

BBPS विवाद दाखल करणे

BBPS बिल पेमेंट विवाद दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा

  • NPCI ने नियुक्त केलेल्या ऑपरेटिंग युनिट्सद्वारे या लिंकच्या साहाय्याने केलेल्या तक्रारींचे निराकरण केले जाते.
  • कृपया लक्षात घ्या की Phonepe या तक्रारींचे निराकरण करत नाही आणि तक्रारीचे निराकरण झाल्यावर कोणतीही सूचना पाठवत नाही.

आधार eKYC तक्रार निवारण

  • आधार eKYC आणि संमती रद्द करण्याशी संबंधित समस्यांसाठी, व्यापारी पुढील मार्गांनी संपर्क साधू शकतात किंवा तक्रार दाखल करू शकतात:
    • व्यापारी अंतर्गत (इनबाउंड) साहाय्यता टीमशी 080-6872-7777/ 022-6872-7777 वर संपर्क साधू शकतात. आम्ही सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सपोर्ट देतो.
    • व्यापारी  PhonePe Business अ‍ॅपच्या होमपेजवर (?) आयकनवर क्लिक करून PhonePe मर्चंट सपोर्टसह तिकीट देखील दाखल करू शकतात. 
  • नोंदणीकृत स्त्रोताकडून, नोंदणीकृत ई-मेल आयडी किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबरकडून तक्रार प्राप्त झाली आहे की नाही याची पुष्टी व्यापाऱ्याकडून केली जाईल. उपस्थित केलेल्या समस्यांच्या प्रकारावर आधारित, संबंधित अंतर्गत टीमला तिकीट नियुक्त केले जाईल जे निर्धारित वेळेत त्याचे निराकरण करतील.
  • ऑनबोर्डिंग संबंधित समस्यांसाठी, तक्रार निवारणाचा कालावधी 5 कामकाजाचे दिवस राहील आणि संमती रद्द करण्यासाठीचा कालावधी 30 कॅलेंडर दिवसांचा असेल.

व्यापारी तक्रार निवारण

ऑफलाइन मर्चंटसाठी

स्तर– 1

  1. तक्रारी नोंदणी:
  •  व्यापारी  PhonePe Business अ‍ॅपच्या होमपेजवर (?) आयकनवर क्लिक करून PhonePe मर्चंट सपोर्टकडे तुम्ही तुमच्या तक्रारीस नोंदवू शकता.
  • याशिवाय, तुम्ही PhonePe Business डॅशबोर्डच्या होमपेजवरील (?) आयकनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही https://business.phonepe.com/faq कडे तक्रार नोंदवू शकता.
  • आम्ही दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस ग्राहक साहाय्यता सेवा ऑफर करतो.

2. तक्रारींचे निराकरण:

  •  तक्रार प्राप्त झाल्यापासून 24 तासांच्या आत आमचा पहिला प्रतिसाद तुम्हाला देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
  • तुमच्या सर्व तक्रारी/प्रश्नांचे 7 दिवसांत निराकरण करण्याचे आमचे ध्येय आहे 
  • बँकिंग, ऑपरेशनल किंवा तांत्रिक कारणांमुळे तुमच्या तक्रारीचे निराकरण होण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमच्या तक्रारीचे निराकरण कोणत्या टाइमलाइन दरम्यान केली जाईल याबद्दल तुम्हाला सक्रियपणे सूचित केले जाईल.   
  • ‘फसवणूक आणि जोखीम मूल्यमापनाशी’ संबंधित तक्रारी अनेक एजन्सींच्या सहभागामुळे तपासण्यासाठी अधिक वेळ घेतात. अशा प्रकरणांमध्ये निराकरणाची वेळ केसच्या तीव्रतेवर आणि जटिलतेवर अवलंबून असते. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला टाइमलाइनबद्दल सक्रियपणे सूचित केले जाईल.

टीप: समस्येच्या निराकारणामध्येमध्ये काही विलंब असल्यास वापरकर्त्यांना सक्रियपणे सूचित केले जाते.

वापरकर्ता समाधानी नसल्यास तक्रारींना स्तर 2 पर्यंत वाढवणे.

स्तर– 2

  1. तक्रारी नोंदणी:

तुमची तक्रार वाढवण्यासाठी तुम्ही खालील चॅनेलवर प्रवेश करू शकता. आमच्या व्यापारी साहाय्यता केंद्रास 080-6872-7777/ 022-6872-7777 वर कॉल करा. आम्ही सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सपोर्ट देतो.

2. तक्रारींचे निराकरण:

  • कॉलवरच पहिला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत                                 
  • स्तर 2 च्या सर्व तक्रारी 7 दिवसांच्या आत सोडवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, निराकरण वेळेत कोणताही विलंब झाल्यास तुम्हाला सक्रियपणे कळवले जाईल.

स्तर– 3

1.         तक्रारी नोंदणी:

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, नोडल ऑफिसर आणि प्रिन्सिपल नोडल ऑफिसर यांचे नाव आणि संपर्क तपशील खाली दिले आहेत:

संपर्क:

प्रमुख नोडल अधिकारी – सिनू सुधाकर  

नोडल अधिकारी – सिनचान कुमार साहा

फोन: 080-68727374/022-68727374

वेबपेज: https://grievance.phonepe.com/

पत्ता- ऑफिस -2, मजला 4,5,6,7, विंग -ए, ब्लॉक – ए, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बेंगलुरु, कर्नाटक – KA, पिन – 560103

कामाचे तास: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत.

2.       तक्रारींचे निराकरण:

तक्रार प्राप्त झाल्यापासून 24 तासांच्या आत पहिला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. स्तर 3 च्या सर्व तक्रारी 7 व्यवसायाच्या दिवसांत सोडवण्याचे आमचे ध्येय आहे. निराकरण वेळेत होणारा विलंब तुम्हाला सक्रियपणे कळवला जाईल.

स्तर– 4

तुमचे प्रश्न किंवा तक्रारींचे मागील स्तरावर 30 दिवसांच्या आत समाधानकारक निराकरण झाले नाही, तर तुम्ही डिजिटल लोकपालाशी संपर्क साधू शकता.

लोकपालचे तक्रार दाखल करण्याचे पोर्टल: https://cms.rbi.org.in/

टोल-फ्री फोन नंबर: 14448

ई-मेल आयडी: [email protected]

पत्ता – सेंट्रलाइज रिसिप्ट अँड प्रोसेसिंग सेंटर, भारतीय रिझर्व्ह बँक, 4था मजला, सेक्टर 17, चंदीगड – 160017

अधिक तपशीलांसाठी, कृपया – RBI Ombudsman ही लिंक पाहा.

ऑनलाइन मर्चंट्ससाठी 

स्तर – 1

1. तक्रार नोंदणी:

a. तुम्ही तुमची तक्रार PhonePe मर्चंट सपोर्टकडे [email protected] वर लिहून नोंदवू शकता.

b. आम्ही आठवड्याचे सातही दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत मर्चंट सपोर्ट ऑफर करतो.

2. तक्रारींचे निराकरण:

a. तक्रार प्राप्त झाल्यापासून 24 तासांच्या आत आमचा पहिला प्रतिसाद तुम्हाला देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

b. तुमच्या सर्व तक्रारी/प्रश्न 7 दिवसांत सोडवणे हे आमचे ध्येय आहे.

c. बँकिंग, ऑपरेशनल किंवा तांत्रिक कारणांमुळे तुमच्या तक्रारीचे निराकरण होण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या तक्रारीची कोणत्या वेळेमध्ये दखल घेतली जाईल याबद्दल तुम्हाला सक्रियपणे सूचित केले जाईल.

d. ‘फसवणूक आणि जोखीम मूल्यमापन’ यासंबंधित तक्रारींच्या तपासासाठी जास्त वेळ लागतो कारण त्यात विविध एजन्सींचा सहभाग असतो. केसची गंभीरता तसेच ती किती गुंतागुंतीची आहे यावर निकालाची वेळ अवलंबून असते. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला वेळेबाबत सक्रियपणे सूचित केले जाईल.

टीप: निराकरण करण्यासाठी वेळ लागत असल्यास युजरना सक्रियपणे सूचित केले जाते.

स्तर 2

1.  तक्रार नोंदणी:

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांनुसार, नोडल ऑफिसर आणि प्रिन्सिपल नोडल ऑफिसर यांचे नाव आणि संपर्क तपशील खाली दिले आहे:

संपर्क:

प्रिन्सिपल नोडल अधिकारी – सिनू सुधाकर

नोडल अधिकारी / तक्रार अधिकारी – सिंचन कुमार साहा

फोन: 080-6872-7777/ 022-6872-7777

वेबपेज:  https://grievance.phonepe.com/

पत्ता – ऑफिस-2, 4 था, 5 वा, 6 वा,7वा मजला, विंग ए, ब्लॉक ए, सालारपुरिया सॉफ्टझोन, सर्व्हिस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगळुरू, कर्नाटक- केए, पिन- 560103.

कामाचे तास: सोम-शुक्र सकाळी 10 ते संध्याकाळी 7.

2.  तक्रारींचे निराकरण:

तक्रार प्राप्त झाल्यापासून 24 तासांच्या आत आमचा पहिला प्रतिसाद तुम्हाला देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लेव्हल 2 च्या सर्व तक्रारी 7 कामकाजाच्या दिवसांत सोडवणे हे आमचे ध्येय आहे. निराकरण करण्यासाठी वेळ लागत असल्यास युजरना सक्रियपणे सूचित केले जाते.

स्तर – 3

मागील स्तरांमध्ये 30 दिवसांच्या आत तुमचे प्रश्न किंवा तक्रारी समाधानकारपणे सोडवल्या गेल्या नाहीत, तर तुम्ही डिजिटल लोकपालाशी संपर्क साधू शकता.

लोकपालचे तक्रार दाखल करण्याचे पोर्टल : https://cms.rbi.org.in/ 

टोल फ्री फोन नंबर: 14448

ईमेल आयडी: [email protected] 

पत्ता – सेंट्रलाइझ्ड रिसिप्ट अँड प्रोसेसिंग सेंटर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 4 था मजला, सेक्टर – 17, चंदीगढ – 160017

अधिक तपशीलांसाठी, कृपया पुढील लिंक रेफर करा – RBI लोकपाल.

PhonePe Logo

Business Solutions

  • Payment Gateway
  • Guardian by PhonePe
  • Express Checkout
  • PhonePe Switch
  • Offline Merchant
  • Advertise on PhonePe
  • SmartSpeaker
  • Phonepe Lending
  • POS Machine

Insurance

  • Motor Insurance
  • Bike Insurance
  • Car Insurance
  • Health Insurance
  • Arogya Sanjeevani Policy
  • Life Insurance
  • Term Life Insurance
  • Personal Accident Insurance
  • Travel Insurance
  • Domestic Travel Insurance
  • International Travel Insurance

Investments

  • 24K Gold
  • Liquid Funds
  • Tax Saving Funds
  • Equity Funds
  • Debt Funds
  • Hybrid Funds

General

  • About Us
  • Careers
  • Contact Us
  • Press
  • Ethics
  • Report Vulnerability
  • Merchant Partners
  • Blog
  • Tech Blog
  • PhonePe Pulse

Legal

  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Grievance Policy
  • How to Pay
  • E-Waste Policy
  • Trust & Safety
  • Global Anti-Corruption Policy

Certification

Sisa Logoexternal link icon

See All Apps

Download PhonePe App Button Icon
LinkedIn Logo
Twitter Logo
Fb Logo
YT Logo
© 2024, All rights reserved
PhonePe Logo

Business Solutions

arrow icon
  • Payment Gateway
  • Guardian by PhonePe
  • Express Checkout
  • PhonePe Switch
  • Offline Merchant
  • Advertise on PhonePe
  • SmartSpeaker
  • Phonepe Lending
  • POS Machine

Insurance

arrow icon
  • Motor Insurance
  • Bike Insurance
  • Car Insurance
  • Health Insurance
  • Arogya Sanjeevani Policy
  • Life Insurance
  • Term Life Insurance
  • Personal Accident Insurance
  • Travel Insurance
  • Domestic Travel Insurance
  • International Travel Insurance

Investments

arrow icon
  • 24K Gold
  • Liquid Funds
  • Tax Saving Funds
  • Equity Funds
  • Debt Funds
  • Hybrid Funds

General

arrow icon
  • About Us
  • Careers
  • Contact Us
  • Press
  • Ethics
  • Report Vulnerability
  • Merchant Partners
  • Blog
  • Tech Blog
  • PhonePe Pulse

Legal

arrow icon
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Grievance Policy
  • How to Pay
  • E-Waste Policy
  • Trust & Safety
  • Global Anti-Corruption Policy

Certification

Sisa Logo

See All Apps

Download PhonePe App Button Icon
LinkedIn Logo
Twitter Logo
Fb Logo
YT Logo
© 2024, All rights reserved